खंबाळे ग्रामपंचायत

सर्वांसाठी पारदर्शक, समर्थ, आणि सर्वसमावेशक शासन

कार्यालय: सोम - शुक्र, 10:00 AM - 6:00 PM
फोन: +91 9923589525

आमच्याबद्दल

📜 खंबाळे गावाची माहिती :
        खंबाळे हे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील, नाशिक जिल्ह्यातील एक निसर्गरम्य गाव आहे. 2011 च्या जनगणनेनुसार गावाची लोकसंख्या 1921 आहे, ज्यामध्ये पुरुष 965 व महिला 956 आहेत. गावातील एकूण कुटुंबसंख्या 344 आहे. गावाला स्वतंत्र ग्रामपंचायत कार्यालय आहे. ग्रामपंचायत कार्यकारिणीत लोकनियुक्त सरपंच सौ. सरला भाऊसाहेब भोईर व उपसरपंच ॲड. ज्ञानेश्वर काळुभाऊ मोरे कार्यरत असून, ग्रामपंचायत सदस्यसंख्या 8 (पुरुष 3, महिला 5) आहे. एकूण कार्यकारिणी 10 सदस्यांची आहे. गाव नाशिकपासून त्र्यंबकेश्वर महामार्गावर 18 किलोमीटर अंतरावर असून, त्र्यंबक नगरीच्या पूर्व दिशेला सुमारे 10 किलोमीटर आहे. गाव सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत वसलेले असल्याने गावाचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते. गावालगत ग्रामपंचायतीचा सुंदर तलाव आहे, ज्यामुळे परिसर अधिक आकर्षक झाला आहे.

🌾 शेती व पाणीपुरवठा :
        गावातील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती हा आहे. गावाचे एकूण क्षेत्रफळ 873 हेक्टर असून, बागायती क्षेत्र 37 हेक्टर, लागवडीयोग्य क्षेत्र 601 हेक्टर व इतर क्षेत्र 235 हेक्टर इतके आहे. व्यापारी दृष्ट्या गाव नाशिक बाजारपेठेच्या जवळ असल्याने शेतमालाच्या विक्रीसाठी सोयीस्कर ठरते. गावासाठी नळपाणीपुरवठा योजना असून सध्या 211 घरांना नळजोडणी केलेली आहे. जलजीवन मिशन अंतर्गत नवीन योजना मंजूर झाली असून तिचे काम प्रगतीपथावर आहे. त्यामुळे गावाला पाणीटंचाईचा त्रास होत नाही. गावाच्या उत्तरेस खंबाळे-दुडगाव हद्दीवर मोठे धरण असून त्यातून गावातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध होते.

🌱 पर्यावरण व शैक्षणिक सुविधा :
        सन 2025 मध्ये पर्यावरण वृक्षलागवड मोहिमेत गावात दोन ते तीन हजार झाडे लावण्यात आली. त्यामुळे गाव अधिक हिरवेगार व पर्यावरणपूरक बनले आहे. गावात जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा (इयत्ता 1 ली ते 4 थी) असून ती पूर्णपणे डिजिटल आहे. तसेच गावात तीन अंगणवाड्या असून, शून्य ते सहा वर्षे वयोगटातील मुलांना पोषण आहार दिला जातो.

🏠 सोयी-सुविधा :
        गावात रेशन दुकान असून दरमहा रेशनचे वाटप केले जाते. पोस्ट ऑफिस देखील गावातच आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी घंटागाडीची सोय असून प्रत्येक घरातून ओला व सुका कचरा वेगळा गोळा केला जातो. हा कचरा स्वच्छ भारत मिशन अंतर्गत केलेल्या सेग्रीगेशन शेडमध्ये टाकला जातो. त्यामुळे गाव स्वच्छ व सुंदर राहते. गावाच्या प्रशासनिक सुविधा जवळ आहेत. पोलीस स्टेशन त्र्यंबकेश्वर येथे (८–१० किमी अंतरावर), तहसील कार्यालय त्र्यंबकेश्वर येथे, तर प्रांत कार्यालय नाशिक येथे आहे. रेल्वे स्टेशन नाशिक रोड (२५–३० किमी अंतरावर) व विमानतळ ओझर (४०–४५ किमी अंतरावर) आहे. गावाचे तलाठी कार्यालय खंबाळे येथेच आहे. "आपले सरकार सेवा केंद्र" गावातच असल्याने सर्व प्रकारच्या ऑनलाइन सुविधा व दाखले ग्रामपंचायतीतून सहज मिळतात. त्यामुळे गाव प्रशासन व नागरिक दोघांनाही सोयीस्कर सेवा उपलब्ध होतात.

👁️

दृष्टी

सिंगापूर सारखी स्वच्छ आणि सशक्त ग्रामस्थी — टिकाऊ विकास आणि सर्वांसाठी सुविधा.

🎯

मिशन

इन्फ्रास्ट्रक्चर सुधारणे, जलप्रबंध, आरोग्य आणि शिक्षणावर लक्ष केंद्रीत करणे.

❤️

मूल्ये

पारदर्शकता, सहभाग, जबाबदारी आणि समावेशी निती.

ग्रामपंचायत कार्यकारी मंडळ

कार्यकारिणी दि.०९/०१/२०२३ ते दि.०८/०१/२०२८

सदस्य

सौ. सोनाली कैलास डगळे
श्री. रमेश ज्ञानेश्वर बुरंगे
श्री. अशोक मनोहर भोईर
श्री. कैलास तानाजी मोरे
श्रीमती. शैला संदीप मोरे
सौ. आशा शरद कचरे
सौ. आलिशा देविदास शिंदे
सौ. तारा सचिन मोरे

अधिकारी वर्ग

श्री. ओंकार पवार

श्री. ओंकार पवार

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक
वर्षा फडोळ मॅडम

सौ. वर्षा फडोळ मॅडम

उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रां प जिल्हा परिषद, नाशिक
प्रतिभा संगमनेरे

सौ. प्रतिभा संगमनेरे

प्रकल्प संचालक(drda)उपमुख्य कार्यकारी, अधिकारी जिल्हा परिषद, नाशिक
रविकांत सानप

श्री. रविकांत सानप

गटविकास अधिकारी, पंचायत समिती, त्रंबकेश्वर
बच्छाव साहेब

श्री. बच्छाव साहेब

गटविकास अधिकारी, त्रंबकेश्वर
प्रतिभा संगमनेरे

श्री. ज्ञानेश्वर सपकाळे

विस्तार अधिकारी, ग्रामपंचायत विभाग, त्रंबकेश्वर पंचायत समिती
प्रतिभा संगमनेरे

श्री.संदीप खैरनार

विस्तार अधिकारी, ग्रामपंचायत समिती, त्र्यंबकेश्वर
राजेंद्र मुरलीधर दहिफळे

श्री. राजेंद्र मुरलीधर दहिफळे

ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत, खंबाळे

संपर्क क्रमांक: +91 9923589525

कार्यकारी मंडळ

सरला भाऊसाहेब भोईर

सौ. सरला भाऊसाहेब भोईर

सरपंच ग्रामपंचायत, खंबाळे
प्रतिभा संगमनेरे

ॲड. ज्ञानेश्वर काळूभाऊ मोरे

उपसरपंच ग्रामपंचायत, खंबाळे
कैलास तानाजी मोरे

श्री. कैलास तानाजी मोरे

ग्रामपंचायत सदस्य, खंबाळे
जयश्री तुकाराम बदादे

सौ. जयश्री तुकाराम बदादे

ग्रामपंचायत ऑपरेटर, खंबाळे

पंचायत राज अभियान

ग्रामपंचायत खंबाळे यांनी पंचायत राज अभियान अंतर्गत विविध विषयांवर केलेल्या कामाची माहिती

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान

राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविण्याबाबत.

कर मागणी सन 2025-26

ग्रामपंचायत खंबाळे कर मागणी सन 2025-26

PDF शीर्षक

आमच्या सेवा

📢

जनसंपर्क

जाहिराती, निवडणूक माहिती, ग्रामसभा बैठका.

💧

पाणी आणि स्वच्छता

पाणी पुरवठा, नलकूप, स्वच्छता मोहिम.

📄

प्रमाणपत्रे आणि नोंदी

जन्म, मृत्यू, राहणीमान प्रमाणपत्रे.

पेमेंट QR कोड

पाणीपट्टी QR कोड
घरपट्टी QR कोड

ताज्या जाहिराती

पाणी पुरवठा ताणाबाबत सूचना
जुलै 5, 2025 — पाणी वितरण वेळेत बदल.
वाचा
बचत गटांसाठी प्रशिक्षण
ऑगस्ट 12, 2025 — स्थानिक सभागृहात ट्रेनिंग.
नोंद
रस्ता दुरुस्ती कामे
ऑगस्ट 1-15, 2025 — मुख्य रस्त्यावर दुरुस्ती कामे सुरू.
वाचा

संपर्क

आपण कार्यालयीन वेळेत कार्यालयात प्रत्यक्ष येऊ शकता किंवा खालील फॉर्मद्वारे आम्हाला संपर्क साधू शकता.

पत्ता

ग्रामपंचायत कार्यालय, खंबाळे

फोन

+91 9923589525

ईमेल

info@khambalegrampanchayat.in

कार्यालय वेळ:   सोम - शुक्र, 10:00 AM - 6:00 PM

गावाचा नकाशा

या नकाशाच्या मदतीने गावातील महत्त्वाचे रस्ते, ठिकाणे आणि कार्यालयांचे अचूक स्थान सहज पाहता येईल.